शिंदे मला मुलासारखं बघतात, ते उपमुख्यमंत्री म्हणजे आपणच उपमुख्यमंत्री

 

स्थापनेपूर्वीच मतदारसंघाच्या विकासाचे प्लॅनिंग ते हे गुवाहटीमध्ये ठरत आहे. म्हणजे राजकारण कुठल्या स्टेपला गेले आहे याची सर्वसामान्य नागरिकांना कल्पनाही येणार नाही. मात्र, बंडखोर आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व किती एकमुखाने मान्य केलंय हे देखील शहाजी बापू पाटलांच्या एका ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहे.

अशातच उपमुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे हेच असणार असेच या क्लिपमधून समोर येत आहे. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपणच उपमुख्यमंत्री आहोत असे आ. शहाजी बापू पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्याला सांगितले आहे. एवढेच नाहीतर विकास कामात कुणाचा अडसर ठरणार नाही. येत्या काळात सांगोला मतदार संघाचा कायापालट होणारच असा विश्वासही त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिला आहे.

आता एवढ्या दिवसांपासून सत्ताकारणाची गणिते गुवाहटीमध्ये जुळवली जात असल्याने कार्यकर्त्यानेही उत्सुकतेपोटी आ. शहाजी बापू पाटलांना विचारलं की, मतदार संघात सर्वकाही ठीक आहे पण कधी घडणार..कधी पर्यंत घडणार हे सर्व त्यावर शहाजी बापू पाटील म्हणाले :- आता साहेब (एकनाथ शिंदे) निर्णय घेणार. साहेबांच्या मनावर.

पुढे बोलताना ते म्हणाले की, एक सांगतो सरकार शंभर टक्के झालं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री. एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री. मंत्रीपदाची चांगली संख्या एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळणार. आपल्याला काय दिलं दिलं नाय दिलं. फडणवीस साहेब मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आपणच उपमुख्यमंत्री आहेत वो…. आता फडणवीस साहेब आणि माझं नातं तुम्हाला माहीत हाय. भावा-भावा सारखं नातं आहे. शिंदे साहेब मला मुलासारखं बघतोय. मुलाच्या नजरेनं बघतंय. लय प्रेमळ नजर त्या माणसाची माझ्यावर हाय हो.

Team Global News Marathi: