“ही जगातली एकांडी घटना असावी” भातखळकर यांनी लगावला शिवसेनेला टोला

 

एकनाथ शिंदे गटाने मॅजिक फिगर ३७ वर पोहोचल्याचा दावा केला आहे. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकरही शिंदे गटात दाखल झाले आहेत.अशातच शिवसेनेचे दोन आमदार मंगेश कुडाळकर आणि सदा सरवणकर गुवाहाटी हॉटेलमध्ये पोहोचले. जर शिंदे गटात 37 आमदार झाल्यास हा आकडा दोन तृतीयांश होईल आणि त्यानंतर पक्षांतरविरोधी कायदा शिंदे कॅम्पला लागू होणार नाही. एकनाथ शिंदे आधीच भाजपसोबत सरकार स्थापन करण्यावर ठाम आहेत.

दरम्यान शिवसेनेच्या आमदारांची संख्या हळूहळू कमी होत आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. मुख्यमंत्र्यांना सोडून अवघे मंत्रिमंडळ पक्षाच्या आमदारांसह फुटते ही जगातली एकांडी घटना असावी, असे अतुल भातखळकर म्हणाले.

महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट हे चित्रपटाच्या स्क्रिप्ट पेक्षा कमी नाही. इथे सूड, बंड आणि नाटक हेच सगळं आहे. शिवसेनेचे आमदार दीपक वसंत केसरकर यांनी देखील उद्धव ठाकरे यांना अल्टिमेटम दिला होता. त्यांचे म्हणणे न ऐकल्यास आपण मार्ग काढू, असे त्यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान आज ते गुवाहाटीत दाखल झाले.

खरे तर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे दीपक केसरकर यांनाही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी संबंध तोडून भाजपशी हातमिळवणी करावी, असे वाटते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ त्यांचे सरकार गमावत नाहीत, तर त्यांचा पक्ष शिवसेनाही कमकुवत होत आहे. पहिल्या दोन तृतीयांश आमदारांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे. आता काही खासदारही पक्ष सोडू शकतात, अशा बातम्या येत आहेत. खासदार राजेंद्र गावित, भावना गवळी आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे हे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत.

Team Global News Marathi: