कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा तर किनारपट्टीलगत सोसाट्याच्या वाऱ्याचा अंदाज

ग्लोबल न्यूज – दक्षिण कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात येत्या 24 तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे. कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाटासह पाऊस पडेल, दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीलगत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता आहे, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खात्रीलप्रमाणे:

कोकण आणि गोवा: मडगाव, पेडणे, केपे, रत्नागिरी 4 प्रत्येकी, चिपळूण, दाभोलीम (गोवा), मालवण, मारमागोवा, फोंडा, सांगे, सावंतवाडी, वाल्पोई 3 प्रत्येकी, कुडाळ, म्हापसा 2 प्रत्येकी, कानकोन, देवगड, दोडामार्ग, कणकवत्नी, लांजा, राजापूर, संगमेश्वर देवरूख 1 प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: पन्हाळा 5, शिराळा, शिरोळ 4 प्रत्येकी, हातकणंगले, कोल्हापूर, मिरज, पाटण 3 प्रत्येकी, आटपाडी, चांदगड, सांगली 2 प्रत्येकी, आजारा, गगनबावडा,
जाट, कवठे महाकाळ, शाहुवडी, तासगाव, वाळवा इस्लामपूर 1 प्रत्येकी.

मराठवाडा: जळकोट 3. विदर्भ: आरमोरी 2, भिवापूर, कुही, मौदा, रामटेक, सिरोंचा 1 प्रत्येकी.घाटमाथा: काही नाही.मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव: काही नाही.

ग्लोबल न्युज नेटवर्क: