पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब ! मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली काळजी

मुंबई : गेल्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रामणात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला.सातारा, सांगली,कोल्हापूर येथील कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असून, मुंबई- ठाण्याकडून या साथीचा फोकस या जिल्ह्यात सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे असा शब्दात त्यांनी काळजी व्यक्त केली.

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब असून, मुंबई- ठाण्याकडून या साथीचा फोकस सातारा,सांगली,कोल्हापूरकडे सरकणे निश्चितच जबाबदारी वाढवणारे आहे.पुढच्यास ठेच,मागचा शहाणा अशी मराठीत म्हण आहे.कोरोना लढ्यात ज्या चुका यापूर्वी इतर काही जिल्ह्यांकडून झाल्या असतील त्या तुम्ही होऊ देऊ नका असे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

इतर देश फक्त कोरोना एके कोरोनाचा मुकाबला करताहेत.आपले तसे नाही.आपल्याकडे आता गणेशोत्सव, मोहरम पार पडला, आता नवरात्र, दसरा, दिवाळी हे सण येतील. त्यातच पावसाला सुरु आहे. त्यामुळे आपले आव्हान अधिक मोठे आहे. हा कसोटीचा काळ आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.सुविधा कितीही उभ्या केल्या तरी शेवटी काही प्रमुख मूळ मुद्य्यांवर लक्ष केंद्रित करा तर १५ दिवसांत चांगले परिणाम दिसतील.

आता ग्रामीण भागातील घरांच्या मालमत्तेवर ग्रामस्थांना मिळणार कर्ज; वाचा सविस्तर

हे मुद्दे म्हणजे एकेका रुग्णांमागचे जास्तीत जास्त संपर्क शोधा,चेस दि व्हायरस मोहीम अधिक गांभीर्यपूर्वक राबवा,कंटेनमेंट क्षेत्रात कडक नियम पाळा, चाचण्यांची संख्या वाढवा, घरोघर सर्व्हेक्षणाला अधिक गती द्या अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना केल्या.

ग्लोबल न्युज नेटवर्क: