राज ठाकरेंच्या टिकेला आमदार रोहित पवारांनी दिले उत्तर |

 

मुंबई | राज्यातील राजकारणात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरूध्द राष्ट्रवादी अशी वादाची ठिणगी पडली आहे, राष्ट्रवादीच्या उदयानंतर महाराष्ट्रात जातीवाद वाढला, असं विधान राज ठाकरेंनी एका मुलाखतीत केले होते. यावर थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर आता मनसे आणि राष्ट्रवादी अशा दोन्ही पक्षांचे नेते टिका करताना दिसत आहे, यावर आमदार रोहित पवार यांनी देखील ट्विटरवर आली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरे साहेब हे अद्भूत वक्तृत्व शैली असलेले नेते आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात ‘लाव रे तो व्हिडिओ.’ च्या वादळी सभांमुळं उडालेली धूळ डोळ्यात गेल्याने भाजपचे भले-भले नेते अजूनही डोळे चोळतायेत. त्यामुळं त्यांच्या प्रत्येक शब्दाला एक वेगळा अर्थ असतो.

तसेच पुढे आणखी एक ट्विट करून ते म्हणतात की ,राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर लगेच लोकांनी डोक्यावर घेतलेल्या या पक्षाला खाली आणायचं असेल तर एकच पर्याय होता, तो म्हणजे जातीयवाद वाढवणं! म्हणून विरोधकांनी विकासाऐवजी जाती-धर्माच्या नावावर समाजात ताण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असाच राज साहेबांच्या बोलण्याचा अर्थ निघतोय! असे ट्विट केले आहे.

 

Team Global News Marathi: