कर्नाटकातील हल्ल्यानंतर संजय राऊतांचं दिल्लीकडे बोट

 

– कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी बेळगावजवळील हिरेबागेवाडी टोलनाक्यावर आंदोलन करताना महाराष्ट्र पासिंग असलेल्या सहा वाहनांना लक्ष्य करत दगडफेक केली, तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यास गेले असता त्यांना कर्नाटक प्रशासनाने ताब्यात घेतल्याने परिस्थिती चिघळली असून या हल्ल्याचे महाराष्ट्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

कर्नाटकात जाणारी एसटी बस वाहतूकही थांबविण्यात आली आहे. तर, राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून खुद्द राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारांनी ४८ तासांचा अल्टीमेटच दिला आहे. त्यानंतर, आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करुन या हल्ल्यामागे दिल्लीचा हात असण्याची शंका उपस्थित केली आहे.कर्नाटकातील हल्ल्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली असून मिंधे सरकार प्रत्युत्तर देत नसल्यानेच हा प्रकार होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या हल्ल्यासंदर्भात शंका उपस्थित करताना सरकारने या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आता, संजय राऊत यांनीही या हल्ल्यामागे दिल्ली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. राऊत यांनी ट्विट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यापूर्वी सुद्धा संजय राऊत यांनी थेट कानडी सरकारवर निशाणा साधला आहे.

”दिल्लीचया पाठिंब्या शिवाय बेळगावात मराठी माणूस व महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला होऊ शकत नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे. महाराष्ट्राचा कणा मोडून मराठी स्वाभिमान कायमचा संपविण्याचा खेळ सुरू झालाय. बेळगावातील हल्ले त्याच कटाचा भाग आहे. ऊठ मराठ्या ऊठ!”, असे ट्विट राऊत यांनी केलं आहे.

Team Global News Marathi: