रास्तवराडीचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपा नेते गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील मतबल नेते असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये सुरु असलेले वाद सर्व महाराष्ट्राला सर्वश्रुत आहेत या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा खटके उडाल्याचे चित्र दिसून आले आहे. अशातच खडसेंनी पुन्हा एकदा महाजन यांना डिवचले आहे. ‘कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल जायचंय तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपचे नेते गिरीश महाजनयांचं नाव न घेता कडक इशारा दिला.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर जळगावामध्ये भाजपचे नेते गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. संजय राऊत यांच्यानंतर पुढचा नंबर हा एकनाथ खडसे यांचा असणार आहे, असा दावाच महाजनांनी केला होता. आज त्यांच्या या दाव्याला खडसेंनी आपल्या शैलीत उत्तर दिले.
ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला आहे. माझ्यामागे ईडी लागली, सीबीआय लागली, अँटी करप्शन लागलं असेल नसेल ते लागलं काय झालं काहीच नाही. विरोधकांना उठलं की फक्त नाथाभाऊच दिसतो. कोणी म्हणते नाथाभाऊ तुरुंगात जाईल, जायचंय तर तुरुंगात जाईल. मात्र माझं एक वाक्य लक्षात ठेवा ‘हम तो डुबेंगे सनम लेकिन तुमको भी साथ लेके डुबेंगे’ असं म्हणत खडसेंनी महाजनांवर जोरदार पलटवार केला.
गावा गावातल्या मुलांना ही माहिती नव्हतं की राज्यपाल कोण आहे. पण राज्यपाल हे कायम वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहे. त्यांची कारकिर्द ही अत्यंत वादग्रस्त ठरली आहे, अशी टीकाही खडसेंनी केली.