हाजी अराफत शेख यांची आज पत्रकार परिषद, मालिकांविरोधात कोणता गौप्यस्फोट

 

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक दररोज एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि भारतीय जनता पाकच्या नेत्यांवर टीका करताना दिसून येत आहे. त्यातच मलिक यांनी काल पत्रकार परिषद घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधताना भाजपा नेते हाजी अराफत शेख यांच्यावर निशाणा साधला होता, त्यातच आज हाजी अराफत शेख पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांचे उत्तर देत, खळबळजनक खुलासे करणार आहेत.

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. सोबतच बनावट नोटांचा खेळ फडणवीसांच्या आशीर्वादानं सुरु होता. बनावट नोटांचं पाकिस्तानपर्यंत कनेक्शन आहे. जे खोट्या नोटांचं रॅकेट चालवत होते त्याला तत्कालिन फडणवीस सरकारचा पाठिंबा होता.

मलिक म्हणाले की, खोट्या नोटांच्या केसेसला कमकुवत करण्याचं काम समीर वानखेडेंनीच केलं. खोट्या नोटाच्या केसचा इंचार्जही समीर वानखेडेच होते, असं ते म्हणाले. खोट्या नोटांच्या रॅकेटमधील इम्रान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ आहे. हाजी अरफात शेख हा भाजपमध्ये पक्षप्रवेश करुन अल्पसंख्याक कमिशनचा अध्यक्ष आहे, असं मलिक म्हणाले. मलिकांच्या याच आरोपांना आज हाजी अरफात शेख उत्तर देणार आहे.

बुधवारी नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यावर भाजप नेते हाजी अराफत यांनी नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिले आहे. हाजी अराफत शेख यांनी सांगितले की, नवाब मलिक यांनी फिल्म सुरू केली आहे, पण आम्ही ती पूर्ण करू. तर नवाब मलिक यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्यांना तातडीने मानसिक उपचारांची गरज असल्याचं हाजी अराफत शेख यांनी सांगितले.

Team Global News Marathi: