भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी आणि त्यांचे नातेवाईक सतत वादग्रस्त विधाने तसेच वर्तणुकीतून पक्षाची प्रतिमा अनेकदा खराब करताना आढळून आले आलेत. अशातच आता बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौतनचे भाजपा आमदार आणि बिहार सरकारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद यांचा मुलगा बबलू यांने दादागिरी केली आहे.
बागेत क्रिकेट खेळणाऱ्या मुलांना मारहाण करत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. मंत्री नारायण प्रसाद यांच्या मुलाने धमकावत हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. यामध्ये लहान मुलासह अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे भाजपाच्या ता मंत्र्यांविरोधात संतापाची लाट पसरली आहे.
समोर आलेल्या गावातील काही मुलं ही बागेत खेळत होती. त्याच दरम्यान बबलू हा मंत्री असलेल्या वडिलांच्या शासकीय वाहनातून आला होता. मंत्र्यांचा मुलगा आणि त्यांच्यासोबत असलेल्या लोकांनी मुलांना मारहाण करत हवेत गोळीबार केला. मारहाणीत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.