पंजाब विधानसभा निडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना काँग्रेससह आम आदमी पक्षाने सुद्धा जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री पदावरून पायउतार झालेले कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी पुन्हा एकदा काँग्रेस तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धूवर निशाणा साधला होता.
नवज्योत सिंग सिद्धू असंतुलित असून त्यांना डोक्याचा भाग नाही, असं अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. तसेच सोनिया गांधी यांनी सिद्धू काँग्रेससाठी कसे आहेत विचारल्यानंतर ते सदस्य होण्याच्या लायक नाहीत, असं सांगितलं पण काँग्रेसने ऐकलं नाही असं देखील अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे. मात्र अमरिंदर सिंह यांच्या या विधानामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नाव वाद होणायचे चिन्ह दिसून येत आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी “मला नवज्योत सिंग सिद्धूंवर बोलायचं नाही. कारण मी त्यांना कायम असंतुलितच म्हटलं आहे. मी पहिल्या दिवसापासून या माणसाकडे डोक्याचा भाग नाही असंच म्हटलं आहे. त्यांना केवळ वेळ वाया घालवायचं माहिती आहे” असं म्हणत निशाणा साधला आहे. या टीकेला सिद्धू काय प्रिंटउत्तेर देतायत हे पाहावे लागणार आहे.