मैदाने, उद्याने, चौपाट्या, हॉटेल आणि मॉल, आज पासून सुरु वाचा नियम

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेनंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण आजपासून मुंबईतील सर्व मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे खुली झाली आहेत. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत या सर्व गोष्टी खुल्या ठेवण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

मात्र हा निर्णय घेताना मुंबई महापालिकेने नियम आणि अटींचं बंधन घातलं आहे, जे नागरिकांना पाळावं लागणार आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील. कोरोना संसर्गाची दुसरी लाट आटोक्यात येत आहे. च्याच अनुषंगाने ब्रेक द चेन अंतर्गत आपण मुंबईत शिथिलता देत असल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. मैदाने, उद्याने, चौपट्या, समुद्र किनारे सुरु राहतील पण यांसाठी वेगवेगळे नियम करण्यात आले आहेत, जे नियम पाळणं नागरिकांना अनिवार्य असेल.

सगळं सुरु तर झालं पण नियम कोणते?

1) लोकल- आरोग्य सेवाव देणारे अधिकारी, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच कोव्हिड लसीच्या दोन मात्रा घेऊन १४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल.

2) हॉटेल- हॉटेल ५० टक्के क्षमतेसह रात्री १० पर्यंत खुली राहणार आहेत. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण आवश्यक आहे. एसी हॉटेलमधील खिडक्या उघड्या ठेवणे बंधनकारक आहे.

3) दुकाने- सर्व दुकाने रात्री १० पर्यंत खुली ठेवता येणार आहेत. दुकानातील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन १४ दिवस होणे आवश्यक आहे.

4) शॉपिंग मॉल- सर्व शॉपिंग मॉल रात्री १० पर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. मॉलमधील सर्व कर्मचाऱ्यांचे दोन्ही डोस पूर्ण घेऊन १४ दिवस होणे आवश्यक आहे.

5) जिम्नॅशिअम, योगासेंटर, सलून-स्पा- वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगासेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेनेसर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा

5) इनडोअर स्पोर्ट्स- लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक, या ठिकाणी खेळताना बॅडमिंटन, टेबल टेनिस, स्क्वॅश, मलखांब अशा खेळांसाठी केवळ दोन खेळाडू या मर्यादेत सुरु करण्याची मुभा

6) विवाह सोहळे- खुल्या प्रांगणातील/बंदिस्त मंगल कार्यालयातील विवाह सोहळे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने सुरु परंतु जास्तीत जास्त २०० व्यक्ती या मर्यादेत असाव्यात

Team Global News Marathi: