राज्यपाल नियुक्त ‘त्या’ १२ जणांच्या यादीतील कोणत्या नावांवर राज्यपालांनी घेतला आक्षेप

 

मुंबई | राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीबद्दलचा पेच अजूनही कायम असून याच मुद्दयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुखमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल कोश्यारी यांची काल संद्याकाळी भेट घेतली होती. ८ महिने उलटून गेल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ठाकरे सरकारनं दिलेली यादी मंजूर केलेली नाही. याच मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी त्यांनी ही भेट घेतली होती.

या भेटीत १२ सदस्यांच्या यादीवर चर्चा झाली. मात्र या १२ नावांमधली काही नावांवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे या नावांच्या बदल्यात दुसरी नावं देता येतील का? यावर महाविकास आघाडीत चर्चा आहे. मात्र त्या १२ यादतीतून कोणत्या नावांना कात्री देण्यात आलेली आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे. राज्यपालांसोबत होणाऱ्या चर्चेत जर राज्यपालांनी १२ नावांपैकी काही नावांवर आक्षेप आहे असं सांगितले. तर महाविकास आघाडी त्यांनी दिलेल्या यादीवर ठाम राहिल का? कारण राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर या नावांची यादी राज्यपालांना पाठवण्यात आली होती.

Team Global News Marathi: