गोवंडीतील उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्याची मागणी, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक पवित्र्यात !

 

मुंबई | गोवंडीतील महापालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेने केल्यामुळे या मागणीला आता हिंदुत्ववादी संघटनेने समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेच्या या मागणीला प्रखर विरोध केला आहे. मात्र दुसरीकडे मनपा प्रशासनाने या मागणीला हिरवा कंदील दाखवला आहे.

आता मापाने सकारात्मक पाठिम्बा दिल्यानंतर हिंदू जनजागृती समितीसह अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांनी महापौर किशोरी पेडणेकर यांची भेट घेतली. उद्यानाला टिपू सुल्तानचे नाव देण्यास लिखित निवेदनाद्वारे तीव्र विरोध दर्शवला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांनी या संदर्भात मागणी केली होती. त्या मुंबई महापालिकेच्या पूर्व उपनगरातील ‘एम/पूर्व’ विभागातील प्रभाग क्र. १३६ मधून नगरसेविका आहेत. प्रभागातील साकीनाका डम्पिंग रोड येथील पालिका उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याबाबत रुक्साना सिद्दीकी यांनी मागणी केली होती. आता याच मुद्द्यावरून समाजवादी पक्ष आणि हिंदुत्वादी संघटना समोरासमोर आल्या आहेत.

Team Global News Marathi: