ठाणे महापालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल |

 

ठाणे | ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल
केल्यामुळे ठाण्यात एकाच खळब उडाली आहे. बुधवारी केळकर विरोधात हा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना रुग्णालयातील एका ३८ वर्षीय महिला परिचारिकेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

समोर आलेली माहिती अशी की, ठाणे महानगरपालिकेचे बाळकूम येथे ग्लोबल कोरोना रुग्णालयात वर्षाआधी पीडित तरुणीची कंत्राटी पद्धतीने परिचारक म्हणून भरती केली होती. त्या दरम्यान उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याकडे कोरोना रुग्णालयाचा पदभार होता.

काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात काम करत असताना पीडित परिचारिकेनं केळकर यांनी विनयभंग केल्याची तक्रार महापालिका प्रशासनाकडे आणि विशाखा समितीकडे केली. मात्र, कागदपत्र अपूर्ण असल्याचं कारण देत त्या पीडित महिलेला कामावरून कमी करण्यात आला होता. याबाबत माहिती भाजप नेत्या चित्रा वाघ यांना समजली.

यावरून चित्रा वाघ यांनी बुधवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेतली. उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावरून विश्वनाथ केळकर यांच्याविरोधातील कारवाईच्या हालचाली सुरु झाल्या. यांनतर पीडित तरुणीनं दिलेल्या फिर्यादीवरून उपायुक्त केळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला.

Team Global News Marathi: