राजापूर | राजापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध अशा गंगातीर्थाच्या विकासासंदर्भात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. शासनाच्या माध्यमातून ९३ लक्ष रुपये निधी मंजूर असून देखील अनेक वर्षे काम न झाल्यामुळे राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी जातीने लक्ष घालून हा निधीचा योग्य कामासाठी वापर होऊन याठिकाणी असलेल्या कामाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
यावेळी गंगा संस्थानच्यावतीने अध्यक्ष मंदार सप्रे यांनी प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल असे सांगितले त्याचप्रमाणे ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख दुधाडे यांनी केले. यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे यासाठी आवश्यक असणारा निधी मिळवून देण्याचे आश्वासन राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी दिले.
याप्रसंगी शहरप्रमुख संजय पवार, गंगासंस्थानचे अध्यक्ष मंदार सप्रे, सचिव श्रीकांत घुगरे, उन्हाळे उप सरपंच चंद्रकांत फळसमकर, माजी सरपंच प्रकाश कणेरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री दुधाडे, श्री. कुलकर्णी आदी उपस्थित होते.