गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबई पोलिसांना केल्या या सूचना

 

मुंबई | मुंबई शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना गणेशोत्सव २०२१ च्या पार्श्वभूमीवर अधिक जागरूक राहण्याचे आदेश सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले आहेत. सध्या कोरोनाच्या तिच्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच तिसरी लाट देशात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊ शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतर राखण्यासह इतर खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विश्वास नांगरे पाटील यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस उपायुक्त आणि पोलीस विभागाचे अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील अत्यंत लोकप्रिय, बहुप्रतिक्षित आणि सर्वात मोठ्या उत्सवापैकी एक असणाऱ्या १० दिवसांच्या गणेशोत्सवाकरीता यंदा शहरात सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

अहवालानुसार, शहरातील पोलिस दल ५००० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरांसह हाय अलर्टवर आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी बुधवारी (१ सप्टेंबर) मुंबई पोलिसांना १० दिवसांच्या कालावधीत कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करताना संकोच करु नका. नियम मोडणाऱ्यांवर, कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई करा, असे स्पष्ट आदेशच दिले आहेत.

Team Global News Marathi: