२०२२ मध्ये कोण होणार मुख्यमंत्री?; जनता म्हणतेय आम्हाला योगी.. आम्हाला योगी..

पुढच्यावर्षी उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर एबीपी नेटवर्कसाठी सी-वोटरने एक राजकीय सर्वेक्षण केले आहे. ज्यामध्ये २०२२ च्या निवडणुकीत राज्याचा मुख्यमंत्री कोण असावा याचा कौल दिला आहे.

या पोलमध्ये पंजाबमधील नागरिकांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणूून पसंती दिली आहे. २१.६ टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहे.

तर, यूपी विधानसभा निवडणूक निकालात पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ हेच बाजी मारतील असा दावा सर्व्हेमध्ये केला आहे. उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, अखिलेश यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी २७ टक्के लोकांनी होकार दिला आहे. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्ये ३० टक्के लोकांना माजी मुख्यमंत्री हरिश रावत मुख्यमंत्रीपदी हवे आहेत. तर यासर्वात सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लोकांनाही ४० टक्के पसंदी दर्शवली आहे.

दरम्यान, गोव्यात मुख्यमंत्री म्हणून भाजपचे प्रमोद सावंत यांनी पहिला क्रमांक गोव्याच्या जनतेने दिला आहे. ३३.२ टक्के लोकांनी त्यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे.

Team Global: