भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावर एका महिलेनं लिव्ह इन रिलेशनशिपचा आरोप गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. आता ही पीडित महिला समोर आली असून आमची डीएनए चाचणी करावी, कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नाही, माझ्या मुलाला वडिलांचे नाव मिळावे, अशी मागणी पीडितेनं केली आहे.
नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे आमदार गणेश नाईक चांगलेच अडचणीत सापडले आहे. ज्या पीडितेनं नाईकांवर आरोप केला. त्या महिलेनं आता समोर येऊन थेट माध्यमांवर आपली भूमिका मांडून गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ केली आहे.माझ्यावर अत्याचार झालाय, माझं शोषण झालंय, मला टॉर्चर केलं गेलंय अशी उद्विग्न प्रतिक्रिया गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या तक्रारदार महिलेने व्यक्त केली आहे.
डीएनए टेस्ट केल्याशिवाय याचा निर्णय लागू शकत नाही. त्यामुळे आमची डीएनए टेस्ट करावी. जिथे जिथे मला मदत भेटेल तिथे तिथे मी जाणार असून मला कुठल्याही राजकीय पक्षाचा दबाव नसल्याचेही पीडित महिलेनं स्पष्ट केलं आहे.