पोरीचा लग्नाला होकार मिळवण्यासाठी गडी मोबाईलच्या टॉवरवर चढला! होकार मिळताच..

लखनऊ । प्रेमात लोक आंधळी होतात हे आपण ऐकलं आहे. इतकंच काय तर प्रेमासाठी लोकं वाटेल त्या थराला जाऊ शकतात. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात घडला आहे. ज्यात एक तरुण आपल्या प्रेमासाठी थेट मोबाईल टॉवरवर चढला आहे.

एक १९ वर्षीय प्रेमी आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी अडून होता. या लग्नासंदर्भात त्याने मुलीशी लग्न करण्यासाठीचा प्रस्ताव मुलीच्या घरी मांडलाही होता. परंतु मुलीकडील कुटुंबिय या लग्नासाठी तयार नव्हते. त्यामुळे तो फिल्मी अंदाजात अनेक फूट उंच असलेल्या मोबाईल टॉवरवर चढला. यातचं लग्नासाठी नकार दिल्यास, टॉवरवरुन खाली उडी मारुन आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर प्रेयसीने ‘हो’ म्हणल्यानंतर तो खाली आला.

इतकंच काय तर, टॉवरवरून खाली आल्यानंतर घरच्यांकडून मार खावा लागेल, या भीतीने खाली उतरल्यानंतर त्याने बेशुद्ध झाल्याचे नाटक केले. परंतु पोलिसांनी त्याला समजावले आणि पुन्हा असे न करण्याचा सल्ला दिला. तसेच, घटानास्थळी असेलल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही केला.

Team Global: