वजन कमी करण्यापासून शुगरवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत अनेक आजारांवर मखाणा आहे फायदेशीर

फ्रेश वाटण्यासाठी अन तरुण राहाण्यासाठी! आहारात करा मखाण्याचा  समावेश

वजन कमी करण्यापासून साखरेवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत अनेक आजारांवर मखाणा आहे फायदेशीर

आपण हल्ली आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे अनेक रोगांना आपणच आमंत्रण देतो. त्यात सगळ्यात मोठा वाटा फास्ट फूडचा असतो. भूक तर लागणारच पण त्यासाठी आरोग्य निरोगी राहील असे कोणते पदार्थ खायचे याचा आपण विचार करतो. या यादीत आता एक नाव समाविष्ट झालं आहे ते म्हणजे मखाणा.

आपल्यापैकी बहुतेकांसाठी वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान आहे. वाढत्या वजनाच्या समस्येमुळे लोकांना केवळ शारीरिकच नाही तर मानसिक त्रास होतो. सध्या खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याकडे लक्ष नसल्यामुळे लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या वजनाच्या समस्येमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो तसेच मधुमेही रुग्णांची गुंतागुंत वाढू शकते. तर असा कोणता आहार आहे का ज्याच्या सेवनाने या तिन्ही समस्यांपासून सहज सुटका मिळेल.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जवळपास प्रत्येक घरात सहज उपलब्ध होणारा मखना या तीन समस्यांवर उपचार करण्यासाठी सर्वोत्तम आहार ठरू शकतो. भारतातील लोक उपवासाच्या वेळी माखणा जास्त खातात. सामान्यतः, उपवास दरम्यान खाल्लेले पदार्थ आरोग्य लक्षात घेऊन शिफारस करतात, कारण ते लोकांसाठी उर्जेचा एकमेव स्त्रोत आहे. पुढील स्लाईड्समध्ये जाणून घेऊया, मखानाचे कोणते गुण ते इतके खास बनवतात?

अनेकांना मखाना भाजून खायला खूपच आवडतात. तर काही जणांना तळून खायला आवडते. तर याची खीरही बनवता येते. पण याचे वैशिष्ट्य म्हणजे तिन्ही पदार्थ बनवून झाले की, या प्रत्येक पदार्थाची वेगळी चव लागते. मखाणा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. मखाणा खाण्याचे फायदे अनेक आहेत.

मखाना खाण्याचे फायदे हे त्यातील पोषक तत्वांमुळे मिळतात. यामध्ये नक्की कोणती पोषक तत्वे आहेत हे तुम्हाला माहीत असायला हवे. यामध्ये साधारण 393 इतकी कॅलरी असते तर 10.71 ग्रॅम प्रोटीन असते. 10.71 ग्रॅम फॅट यामध्ये असते. त्यामुळे तुमचा वजन वाढण्याचा प्रश्न येत नाही. 71.43 ग्रॅम इतके कार्बोहायड्रेट यामध्ये असते. तर 3.6 ग्रॅम इतके फायबर असते. यामुळे तुम्ही जेव्हा मखाना खाता तेव्हा तुम्हाला बराच वेळ भूक लागत नाही. तर यामध्ये काही प्रमाणात साखरही असते. यातून तुमच्या शरीराला कॅल्शियम, पोटॅशियम आणि सोडियम ही पोषक तत्वेदेखील मिळतात. म्हणूनच हल्ली मखाण्याला जास्त मागणी आली आहे.

मखाणा अर्थात कमळाच्या बिया. हा अत्यंत स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. अनेक नावाने याची ओळख आहे. यामध्ये अनेक पोषक तत्व असतात ज्याबद्दल आपण जाणून घेतलं आहे. आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. याचे नक्की काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया.

कमळाच्या बिया अर्थात मखाणामध्ये एथेनॉलचा असणारा अर्क हा शरीरातील फॅट अर्थात चरबीचे सेल्स नियंत्रित करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही जिमला जाता अथवा डाएट प्लॅन करता तेव्हा त्यामध्ये मखानाचा समावेश करण्यता येतो. यामुळे पोट भरलेले राहते आणि भूक लवकर लागत नाही. त्यामुळे वजन कमी करून ते नियंत्रणात राहण्यासाठी मदत मिळते.

ब्लडप्रेशर अर्थात रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्हाला मखाणा खाण्याचे अनेक फायदे मिळतात. नियमित तुम्ही मखाणाचे सेवन केले तर या गंभीर समस्येपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. कारण यामध्ये असणारे अल्कलॉईड हायपरटेन्शन अर्थात हाय ब्लड प्रेशरच्या समस्येला नियंत्रित करणारे पोषक तत्व असतात. त्यामुळे रक्तदाबाची समस्या असेल तर ती नियंत्रित करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे.

मधुमेह हा आजार हल्ली खूपच लोकांमध्ये पाहायला मिळतो. बदलत्या लाईफस्टाईलमुळे अगदी लहान वयातही अनेकांना मधुमेहासारख्या आजाराला सामोरं जावं लागत आहे. या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही मखाण्याचा उपयोग करून घेऊ शकता.

उच्च रक्तदाब आणि मधुमेह या दोन्ही आजारांमुळे हृद्यावर ताण येतो. हे दोन्ही आजार हृदयरोगासाठी जोखीम असणारे ठरतात. त्यामुळे मखाण्याचे सेवन हे हृदयासाठीही फायदेशीर ठरते. एका शोधात सिद्ध झाल्याप्रमाणे मखानामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी आणि अँटिमायक्रोबियल गुण आढळतात. मखाण्यामध्ये असणारे हे दोन्ही गुण हिरड्यांशी संबंधित सूज आणि विषाणूंमुळे होणाऱ्या दातांच्या त्रासाला रोखण्यास मदत करतात. त्यामुळे हिरड्यांच्या सुजण्याचा त्रास असल्यास, तुम्ही नियमित मखाण्याचे सेवन करावे.

आपली त्वचा चांगली राहावी यासाठी आपण अनेक गोष्टी करत असतो. नियमित पार्लरमध्ये जाण्यापेक्षा तुम्हाला जर त्वचेसंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही नियमित मखाण्याचे सेवन करावे. इतकंच नाही तर मखणाचा तुम्ही त्वचेवर उपयोग करून त्वचा अधिक चांगलीही राखू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट गुण असतात, जे त्वचेचं आरोग्य राखून वयाचा प्रभावा कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसंच सुरकुत्या कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

ग्लोबल न्युज नेटवर्क: