परमबीर सिंहाच्या घरापुढे पोहोचली मुंबई पोलीस टीम, दारावर चिकटवली नोटीस

 

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुक्घांवर १०० कोटी हप्ता वसुलीचा आरो लगावत एकाच खळबळ उडवून दिली होती या प्रकरणानंतर सिंह यांच्या विरोधात त्यांच्यात खात्यातील आदिकार्यांनी तक्रारी दाखल केल्या होत्या या तक्रारीनंतर ते कायबी झाले होते. तसेच ते देशाबाहेर पळून गेल्याची चर्च सुद्धा होता होती मात्र त्यांच्या वकिलांनी ते भारतातच असल्याचे काबुल केले होते.

त्यातच आता परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेला सुरूवात केली आहे. न्यायालयाकडून आता परमबीर सिंह यांना इशारा देण्यात आला आहे. जर परमबीर सिंह ३० दिवसांच्या आत न्यायालयात हजर झाले नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे परमबीर सिंह न्यायालयात हजर राहिले नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे.

मंगळवारी पोलिसांनी परमबीर सिंह यांच्या जुहू येथील घरासमोर न्यायालयाचा आदेश लावला आहे. पोलिसांनी लावलेल्या आदेशामध्ये परमबीर सिंह फरार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. १७ नोव्हेंबर रोजी परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केलं आहे. परमबीर सिंह यांना मुंबई पोलिसांनी गोरेगाव वसूली प्रकरणी समन्स पाठवले होते. अनेकवेळा नोटीस पाठवूनही परमबीर सिंह गैरहजर राहिल्याने न्यायालयाने शेवटी परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं.

Team Global News Marathi: