तीन पिढ्यांपासून बीएमसी चालवणारं ठाकरे कुटुंब फेल, खासदार नवनीत राणा यांची घणाघाती टीका |

 

शनिवार पासून मुंबईत पडणाऱ्या धो-धो पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले होते. तसेच विविध ११ ठिकाणी पावसामुळे घडलेल्या घटनेत एकूण ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. याच मुद्द्यावरून आता अपक्ष खासदार नवनीत राणा कौर यांनी थेट मुंबई मानपामध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेला टार्गेट केले आहे.

मुंबई तुंबली, मुंबई महानगर पालिका बुडाली पाण्यात, ठाकरेंची तिसरी पीढी असफल, मनपाचे पावसाळापूर्व नियोजनाचे तीनतेरा, माझी मुबंई माझी जबाबदारी म्हणणाऱ्या ठाकरे परिवाराच्या अनागोंदी कारभारामुळे सर्व मुंबईकरांना नाहक त्रास होत असल्याचं नवनीत राणा म्हणाल्या.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी बीएमसीचे लोकं कोट्यवधी रुपये नालेसफाई आणि ड्रेनेज सफाईसाठी खर्च करतात. बीएमसीच्या खर्चाबाबत थर्डपार्टी ऑडिट करणं गरजेचं आहे. त्यासाठी केंद्राने संसदीय समिती नेमण्याची गरज आहे. बीएमसीकडून किती रुपये खर्च केला जातो हे जनतेसमोर येईल. त्यामुळे मी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संसदीय समितीकडे याबाबत मागणी करत असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

 

Team Global News Marathi: