आर्यन खान प्रकरणावरुन नितेश राणेंची नवाब मलिकांवर टीका

 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर बनावट डॉक्युमेंट्सच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. यासोबतच नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर इतरही अनेक गंभीर आरोप लावले आहेत. आता या प्रकरणात आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिक यांच्यावर अनेक तोफ डागली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल बोलताना म्हणाले की, इंटरव्हलपर्यंत नवाब मलिक आहेत. इंटरव्हलनंतर मी बोलणार. तर त्यांना मी सांगतो की क्लायमेक्स मी करणार, असा सूचक आणि थेट इशाराच नितेश राणे यांनी राऊतांना दिला आहे. यापूर्वी सुद्धा मोहित कंबोज यांनी एक बडा मंत्री या पार्टीला हजर असल्याचे बोलून दाखविले होते त्यामुळे उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

तर मलिक यांनी पत्रकार परिषेद घेऊन आज पुन्हा एकदा समीर वानखडे यांच्यावर गंभीर आरोप लगावले आहेत नवाब मलिक पत्रकार परिषदेत म्हणाले की, समीर वानखेडेंनी मुंबई पोलिसांकडून माझ्या मुलीचा सीडीआर मागवला. सीडीआर गुन्हेगारांचा मागितला जातो. सीडीआर मागवायला माझी मुलगी निलोफर मलिक गुन्हेगार आहे का? कोणत्या आधारावर माझ्या मुलीची खासगी माहिती मागवली जातेय? असा सवाल नवाब मलिकांनी वानखेडेंना विचारला आहे.

Team Global News Marathi: