अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही, देवेंद्र फडणवीसांचा आघाडी सरकारला टोला

 

बईत सापडलेल्या ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान प्रकरणात एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यात खंडणी, लाचखोरी आणि बनावट कागदपत्राद्वारे नोकरी मिळवल्याच्याचा आरोपांचा समावेश आहे.

 

या प्रकरणावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. पंचांची विश्वासार्हता संपायला नको, असं मत फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. ते आज दादरा नगर-हवेलीत बोलत होते. ते डेलकर यांच्या मृत्यूनंतर लागलेल्या पोट निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले असताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता

फडणवीस म्हणाले की, अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नाही. जे साक्षीदार आहेत त्यांची विश्वासार्हता संपेल. अशी कारवाई झाल्यास साक्ष द्यायला पुढे कुणी येणार नाही. पण मी मानतो की काही आरोप लागले आहेत तर एनसीबीने त्याची चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे आरोप आणि इशाऱ्यावर बोलताना अधिकाऱ्यांना धमकावणं योग्य नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.

Team Global News Marathi: