संजय राऊत वसई-विरारपासून कुलाबापर्यंत बेनामी संपत्ती कशी जमवली? मोहित कंबोज यांचा आरोप

 

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आज पत्रकार परिषेद घेऊन काय खुलासा करणार यादी संपूर्ण राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे अशातच राऊत यांच्या पत्रकार परिषदेपूर्वीच भाजपा नेते मोहित कंबोज यांनी राऊतांवर घणाघाती आरोप केले आहेत. मागील पत्रकार परिषदेत राऊतांनी मोहित कंबोज यांचं नाव घेत थेट देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केले होते. मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसांना बुडवणार असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यानंतर कंबोज यांनीही संजय राऊतांवर पलटवार केला होता.

आज पुन्हा शिवसेना नेते संजय राऊत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत ते कुणाला टार्गेट करतात याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तत्पूर्वी मोहित कंबोज यांनी ट्विटरवरून संजय राऊतांना डिवचलं आहे. तसेच बेनामी संपत्ती जमावल्याचा आरोप सुद्धा मोहित कंबोज याने संजय राऊत यांच्यावर लगावला आहे.

कंबोज म्हणाले की, संजय राऊत तुमचे आणि प्रविण राऊत यांचा संबंध काय? प्रविण राऊतांनी जी बेनामी संपत्ती जमवली ती कुठून आली? मागच्या पत्रकार परिषदेत तुम्ही जे जे आरोप लावलेत, ईडीमध्ये जाणार, सीबीआयकडे जाणार त्याचं काय झालं? मोठमोठे आकडेवारी दिली ती सलीम-जावेदची स्टोरी बंद केला. स्वत:वर टांगती तलवार असताना दुसऱ्यांवर आरोप करून दिशाभूल करण्याचं काम बंद करा असं त्यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: