पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमती पालकांची डोकेदुखी, स्कूलबसच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ

 

मुंबई | कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी अनेक पालक दारात स्कूल बस येण्याची वाट पाहत आहेत. मात्र आता ही स्कूल बस पालकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. स्कूल बस फीचे भाव ३० टक्क्यांहून अधिक वाढ करण्याचा विचार स्कूल बस मालक करीत आहेत.

येत्या 1 एप्रिलपासून 100 टक्के स्कूल बस सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय स्कूल बस ओनर्स असोसिएशनने घेतला आहे. मागील दोन वर्षांपासून स्कूल बसेसची सेवा बंद आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा सुरू झाल्यानंतर पालकच आपल्या पाल्याची शाळेतून ने-आण करीत होते. पण आता शाळा पूर्ण वेळ ऑफलाईन भरू लागल्या आहेत. त्यामुळे नोकरीवर जाणारे पालक स्कूल बस कधी सुरू होणार याची वाट पाहत आहेत.

एसएससी बोर्डाच्या शाळांकडून स्कूल बसेसना प्रतिसाद फारसा मिळत नाही. आयसीएसई, सीबीएसईसह इतर इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांमध्ये स्कूल बसची मागणी अधिक आहे. या शाळांना सध्या सुट्टी सुरू असली तरी 1 एप्रिलपासून त्या पुन्हा सुरू होणार आहेत. ज्या मार्गावर स्कूल बसेसने प्रवास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे , अशाच मार्गावर स्कूल बस उपलब्ध करून मिळतील , असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: