ईडीकडून नवाब मलिक यांची चौकशी

 

मुंबई | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून  ईडीच्यावतीने गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील नेत्यांवर कारवाई केली जात आहे. या दरम्यान आज पहाटे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीच्यावतीने कारवाई करण्यात आली आहे. आज पहाटे मलिक यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आले आहे.

ईडीच्यावतीने केल्या जात असलेल्या कारवाईविरोधात अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांच्याकडूनही ईडीवर निशाणा साधण्यात आला. दरम्यान जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची ईडीने चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. पहाटेच ईडीच्या पथकानी नवाब मलिक यांच्या घरी दाखल होत चौकशी करण्यास सुरुवात केली. दरम्यान मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू केली जात आहे.

दरम्यान काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू’ असा इशारा मलिक यांनी दिला होता. आता ईडीच्यावतीने मलिक याची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

Team Global News Marathi: