पॉर्न व्हिडिओ दाखवून मामीने भाच्यावर केले लैंगिक अत्याचार

 

नागपुरात मामीने आपल्या अल्पवयीन भाच्याचे लैंगिक शोषण करून त्याच्यावर अत्याचार केले आहेत. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी या ठिकाणी घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाने दिलेल्या तक्रारीवरून 21 वर्षीय मामीविरुद्ध पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलगा दहावीच्या वर्गात शिकतो. या मुलाचे वडील मोलमजुरीचे काम करतात. दोन वर्षांआधी पीडित मुलगा आपल्या मामाकडे गेला, तेव्हा मामीने पीडित भाच्याला अश्लील व्हिडिओ दाखवून त्याचे पहिल्यांदा लैंगिक शोषण केले. हि आरोपी मामी एवढ्यावरच थांबली नाही तर तिने या घटनेचे स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रीकरणसुद्धा केले.

काही दिवसाने पीडित मुलगा हा आपल्या घरी परतला. यानंतर या मामीने पीडित भाच्याशी मोबाइलवर संपर्क साधून त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पीडित मुलाला वारंवार घरी बोलावून त्याचे लैंगिक शोषण केले. चार महिन्यांपूर्वीच आरोपी मामीचा पतीसोबत वाद झाला तेव्हा ती आपल्या माहेरी राहायला गेली. त्या ठिकाणीसुद्धा मामीने आपल्या भाच्याला बोलून त्याचे वारंवार लैंगिक शोषण केले. यानंतर हा त्रास असह्य झाल्यामुळे पीडित मुलाने आपल्या नातेवाईकांना याबाबत माहिती दिली या संदर्भात पॉस्को कायद्यांतर्गद मामीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: