माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना कोर्टाने ५००० रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे दिले आदेश

 

मुंबई | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. परमबीर सिंग यांनी निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे. ५ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चर्चेत आले आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. या आरोपांसंदर्भात चौकशीसाठी राज्य सरकारकडून निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. आयोगाला दिवाणी न्यायालयीन अधिकार बहाल करण्यात आले आहेत. याबाबत निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेचा जबाब नोंदवला आहे. आयोगाने समन्स बजावून सचिन वाझेला हजर राहण्याचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांनी स्वतः सचिन वाझेचा जबाब नोंदवला.

तसेच न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या नेतृत्वात आयोगाची स्थापना करण्यात आली. उच्च न्यायलयाच्या विद्यमान न्यायमूर्तींना अनुज्ञेय असलेले वेतन आणि भत्ते इतके मानधन मिळणार आहे. उच्चस्तरीय चौकशी समितीचे वकील अॅड. शिशिर हिरे यांना प्रत्यक्ष सुनावणीसाठी दिवसाचे १५ हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.

Team Global News Marathi: