..मात्र कधीही मनमोहन सिंगांनी कधी बॅनर झळकावले नाहीत, काँग्रेसने पुन्हा साधला मोदी सरकारवर निशाणा !

 

नवी दिल्ली | देशात कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण मोहीम अधिक गतीमान करण्यात आली असून सोमवारी एकाच दिवसांत रेकॉर्डब्रेक लसीकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बॅनर झळकावून अभिनंदन करण्यात आलं आहे. त्याबद्दल काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी सरकारचे अभिनंदन केले असून मोदी सरकारला सल्लाही दिला आहे. तर, रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या जाहीरातबाजीवर टीका केली आहे.

देशात २१ जून रोजी झालेल्या रेकॉर्डब्रेक लसीकरणाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले. तसेच, केवळ एका दिवसांत ८० लाख डोस देऊन काहीही होणार नाही, तर दररोज ८० लाख नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याचेही राहुल गांधींनी म्हटले आहे. राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ता रणदीपसिंग सुरजेवाला यांनी मोदी सरकारवर टीका केली. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी कोरोनावर श्वेतपत्रिका काढली असून पत्रकार परिषदेमध्ये याबाबत विस्तृत माहिती दिली.

मोदी सरकारसाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील उपाययोजनांसाठीचा अहवाल या श्वेत पत्रिकेमध्ये तयार करण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेसाठी सरकारने अगोदरपासूनच तयारीनीशी सज्ज राहायला हवं, असेही राहुल गांधींनी म्हटलं आहे. मनमोहनसिंग सरकारच्या काळात फेब्रवारी २०१२ मध्ये देशात एकाच दिवसांत सर्वाधिक रेकॉर्डब्रेक पोलिओ डोस देण्यात आले होते. मात्र, तेव्हा कुठेही त्याचे बॅनर झळकविण्यात आले नाहीत. सध्याच्या पंतप्रधानांमध्ये आणि तेव्हांच्या पंतप्रधानांनमध्ये हाच फरक असल्याची टीका सुरजेवाला यांनी केली आहे.

 

Team Global News Marathi: