दोन लसधारकांसाठी रेल्वे प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय 

 

 

मुंबई | संपूर्ण राज्यात कोरोना लसीकरण युद्ध पातळीवर सुरु असल्याकारणामुळे हळु-हळु संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात येताना दिसून येत आहे. त्यातच काही प्रमाणात मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल सेवा आता पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. त्यातच आता रेल्वे प्रशासनाने लोकलबाबत खूप मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

दोन लस घेऊन १४ दिवस उलटून गेलेल्या प्रवाशांसाठी लवकरच ‘मोबाइल तिकीट अ‍ॅप’ सुविधा सुरू करण्याचा विचार मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन करत आहे. युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासला (यूटीपी) मोबाइल तिकीट अ‍ॅप जोडण्याचा प्रयत्न असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे आता लोकलने प्रवास करणे अधिक सोईचे होणार आहे.

 

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सुनीत शर्मा हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. त्या वेळी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत प्रवाशांच्या सुकर प्रवासासाठी मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा सुरू करण्यावर चर्चा झाली. अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली लोकल सेवा दोन लस घेतलेल्या सामान्य प्रवाशांसाठीही सुरू करण्यात आली.

 

सुरुवातीला मासिक पास तर त्यानंतर मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारच्या सूचनेनंतर तिकीट सुविधाही उपलब्ध करून दिली. एटीव्हीएम, जनसाधारण तिकीट सेवा आणि मोबाइल तिकीट अ‍ॅप सुविधा बंद असल्याने पास आणि तिकीट काढण्यासाठी काही स्थानकांत तिकीट खिडक्यांसमोर गर्दी होऊ लागली. कोरोनाचे रूग्ण कमी झालेत पण धोका कमी झालेला नाही. अशावेळी गर्दी टाळणं आवश्यक आहे. त्यामुळे मोबाइल तिकीट अ‍ॅपची सुविधाही उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Team Global News Marathi: