राज्यात ‘या’ दिवशी ढगांच्या गडगडासह पावसाची शक्यता !

 

दक्षिण भारतात पावसाचा कहर सुरू असताना आता महाराष्ट्राला देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या विकेंडला जर तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर सावधान कारण १२ ते १४ नोव्हेंबर दरम्यान राज्यात मेघ गर्जनेसह पावसाचा भारतीय इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.

दक्षिण कोकणात सर्वाधिक पावसाचा जोर पहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, पुण्यासह ११ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून पुण्यात पाऊस सुरू आहे. या विकेंडला पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विकेंडला घराबाहेर पडताना पुण्यातील नागरिकांनी १० वेळा विचार करावा.

 

दक्षिण भारतात गेल्या चार दिवसांपासून धुव्वाधार पाऊस सुरू आहे. बुधवारी चेन्नई,तिरुव्रुर,कांचीपूरम आणि पाँडेचेरीच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ११ आणि १२ नोव्हेंबरल दक्षिण भारतातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय. ११ नोव्हेंबरला तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्ट्यांवर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागात रेड अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर १२ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह दक्षिण भारतातील काही जिल्ह्यांना यलो तर काही राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

Team Global News Marathi: