‘या’ कारणामुळे मनसेने केली आयपीएलच्या बसची तोडफोड

 

मुंबई | आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या व्हॉल्वो बसची मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा तोडफोड केली.ताज हॉटेलबाहेर असणारी ही बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडली असून यावेळी त्यांनी बसवर ‘मनसेचा दणका’ असे पोस्टर चिकटवत तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

प्रकरण असे की, आयपीएलच्या खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईच्या व्यावसायिकांना न दिल्याने मनसे आक्रमक झाली आहे. आयपीएलमधील खेळाडूंसाठी आणलेली बस मनसे कार्यकर्त्यांनी फोडली. रात्री ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास ताज हॉटेलसमोर ही घटना घडली असल्याची माहिती आहे. या प्रकरणी मनसे वाहतूक सेनेच्या उपाध्यक्ष प्रशांत गांधी यांच्यासह वाहतूक पदाधिकाऱ्यांना कुलाबा पोलिसांनी अटक केली आहे.

आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईतील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळंच वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंसाठी आलेली बस काल रात्री फोडली आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यातील वाहतूक व्यवसाय हा महाराष्ट्रातील व्यावसायिकांना डावलून बाहेरच्यांच्या घशात घालायचा प्रयत्न सुरू होता. तसेच आयपीएल व्यवस्थापन आणि सरकार दरबारी विनंती करूनही काही बदल झाला नाही. त्यामुळे मनसेने हा दणका दिला आहे अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: