आम्हाला घरकी काँग्रेस नको, तर सबकी काँग्रेस हवी !

 

नवी दिल्ली | पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर कॉँग्रेसमध्ये ‘गांधी विरुद्ध जी-२३’ वाद पुन्हा एकदा समोर आला असून जी-२३ मधील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी देशभरात कॉँग्रेसच्या होत असलेल्या पराभवावर नाराजी व्यक्त करत आता तरी गांधी घराण्याने काँग्रेसच नेतृत्व सोडून इतरांकडे नेतृत्व सोपवावं, असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. आम्हाला घरकी काँग्रेस नको, सबकी कॉँग्रेस हवी, असं म्हणत त्यांनी नेतृत्वाच्या मुद्यावरून गांधी कुटुंबियांवर निशाणा साधला आहे.

विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या पराभवाबद्दल आश्चर्य वाटले नाही. काँग्रेसमधील जी -२३ गटाने २०२० साली काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींकडे एका पत्राद्वारे पक्षाच्या कारभारासंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. या पत्रावर स्वाक्षरी करणाऱया नेत्यांपैकी एक असणाऱया सिब्बल यांनी गांधी कुटुंबाने काँग्रेसचे नेतृत्व सोडावे असे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटल आहे.

काँग्रेस पक्षाच्या वाताहतीबद्दल नेत्यांनी वेळीच आत्मपरीक्षण करायला हवे होते. आतापर्यंत याबाबतच ‘चिंतन’ पूर्ण होऊन इतर कोणाकडे तरी नेतृत्व सोपवायला हवं होतं, असं स्पष्ट मत सिब्बल यांनी व्यक्त केलं. राहुल गांधी पंजाबमध्ये गेले आणि त्यांनी चन्नी हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. पण त्यांनी तो निर्णय कोणत्या अधिकाराने घेतला? ते पक्षाचे अध्यक्ष नाहीत तरी ते सर्व निर्णय घेतात. ते आधीच डी फॅक्टो अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते लोक पुन्हा राहुल यांना का नेतृत्व करायला सांगतायत, असा प्रश्न करत सिब्बल यांनी राहुल गांधींकडे पुन्हा नेतृत्व सोपविण्यास विरोध दर्शविला.

Team Global News Marathi: