बेताल वक्तव्यासाठी नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद दिलंय का?

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टिकेनंतर शिवसेना-भाजपमध्ये शाब्दिक शीतयुद्ध सुरु झाले होते. चिपी विमानतळाच्या उदघाटन प्रसंगाच्या मुद्द्यावरून मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एका शिवसेना पक्षाला डिवचले होते. आता राणेंनी चिपी विमानतळाच्या मुद्द्यावरून केलेल्या टीकेला शिवसेना आमदार डॉ मनीषा कायंदे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

चिपी विमानतळाच्या होऊ घातलेल्या उद्घाटन कार्यक्रमावरून नारायण राणे व त्यांची मुलं बेताल वक्तव्य करत आहे व मुख्यमंत्र्यांना बोलवायची काय गरज आहे प्रोटोकॉल वगैरे अशा गोष्टी ते लोकांना शिकवत आहेत जणू काही त्यांना भारतीय जनता पार्टीने केंद्रीय मंत्री केले आहे ते शिवसेनेवर टीका करण्याच्या एकमेव दृष्टिकोनातून केले आहे की काय असा प्रश्न सामान्यांच्या मनात उद्भवत आहे, अशी टीका शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनी केली आहे.

तसेच खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधताना म्हणाले की, नारायण राणे यांना ह्या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. त्यांनी फुशारकी मारताना थोडे तरी भान ठेवावं. उद्घाटन करायला २२ वर्षे झाली. इतकी वर्षे राणे होते कोठे? आतापर्यंत फक्त १४% काम झाले होते. दिपक केसरकर पालकमंत्री असताना त्यांनी निधी दिला. मी स्वत: यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. बाप-बाप म्हणून मिरवणारा नितेश राणे यांना ह्या विमानतळाचे श्रेय घेता येणार नाही. ज्याला कायदा समजत नाही असा अडाणी मंत्री झाला हे आमचे दुर्दैव.” असे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविले होते.

Team Global News Marathi: