माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाच्या मुसक्या आवळा | स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना पत्र

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यातील वाद सर्व महाराष्ट्राला माहिती असून अनेकदा यांच्यात खटके उडताना दिसून आले आहेत. त्यातच खोत यांच्यावर टिक केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांच्यासह साथीदारांनी मारहाण व शिविगाळ केली. यामुळे स्वाभिमानी आणि खोत यांच्यात वाद उफाळला आहे.

राजु शेट्टी यांच्या सोबत काम करतो हा राग मनात धरून त्यांनी रविकिरण माने यांना धमकावले. याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या मुलाचा कारनामा बागल यांनी सांगितला.

यावेळी संशयित आरोपी सागर खोत व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी व समाजामध्ये दहशत पसरवू पाहणाऱ्या खोत यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी राज्याचे गृहमंत्री नामदार वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत गृहमंत्र्यांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली. तातडीने याबाबत गृहविभागाकडून तातडीने कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचे बागल यांनी सांगितले.

Team Global News Marathi: