‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?’; न्यायालयाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे मागितले उत्तर

 

मुंबई | काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लॉकडाऊन काळात खाजगी कामासाठी सरकारी खर्चातून विमानाने प्रवास केल्याच्या मुद्द्यावरून भरतीय जनता पक्षाने ऊर्जामंत्री राऊत तसेच महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली होती. तसेच कोर्टात याचक दाखल केली होती.

विमान प्रवासासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केलेली रक्कम परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पाठक यांनी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे. आता नितीन राऊतांना २८ जुलैपर्यंत उत्तर देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

तसेच नियमांचं उल्लंघन केल्याने नितीन राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हटवावं अशीही मागणी विश्वास पाठक यांनी केली आहे. एवढंच नाही तर विश्वास पाठक यांनी उर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विमान प्रवासाच्या खर्चाचा तपशील देणारी कागदपत्रं आणि राऊत यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीची प्रतही कोर्टात सादर केली.

वीज बिलांची वसुली करण्यासाठी सामान्य माणसाचा वीज पुरवठा तोडणाऱ्या महावितरणकडे मंत्र्याने खासगी कामासाठी केलेल्या विमान प्रवासावर खर्च करण्यासाठी पैसा आहे, अशी टीकाही पाठक यांनी केली होती.

Team Global News Marathi: