पंकजा म्हणाल्या, ‘माझे नेते मोदी-शाहा’, आता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया |

 

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात स्थान न दिल्यामुळे नाराज असलेल्या मुंडे भगिंनीनी मुंबई येथील कार्यालयात आपल्या सर्व समर्थकांची बैठक बोलावून सर्वांना शांत राहण्याचे आव्हान करत राजीनामा न देण्याची विनंती कार्यकर्त्यांना केली होती तसेच माझे मोदी, शहा आणि नड्डा हे नेते असून फडणवीसांचे नाव न घेता पंकजा मुंडेंनी टोला लगावला होता. आता यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिलेली आहे.

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी भाषण केलं, तुम्ही ते भाषण ऐकलं का? असा प्रश्न पत्रकारांनी देवेंद्र फडणवीसांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, ‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’, असं म्हणत फडणवीसांनीही पंकजांना त्यांच्याच पद्धतीने प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

“पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही. आमचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी पंकजा ताईंच्या भाषणावर खुलासा केला आहे. त्यांच्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर खुलासे केले आहेत. त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही”, असं म्हणत ‘पंकजा’ या विषयावर फडणवीसांनी अधिक बोलणं टाळलं होत.

Team Global News Marathi: