गरजू विद्यार्थ्यांसाठी नगरसेवक अमेय घोले यांच्या माध्यमातून लॅपटॉप आणि टॅबचे मोफत वाटप

 

मुंबई | माजी आरोग्य समितीचे अध्यक्ष, शिवसेना नगरसेवक व युवासेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी त्यांच्या विभागातील ( विभाग क्रमांक १७८) गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप आणि टॅब’च वाटप करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. यापूर्वी सुद्धा नगरसेवक अमेय घोले यांनी प्रभागातील नागरिकांसाठी विविध उपक्रम राबवले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी भर दिला आहे.

आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तसेच आजच्या तांत्रिक युगात विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाही ओळख होणे ही काळाची गजर बनत चालली आहे. याच काळात कोरोनाच्या संसर्गात बंद असलेल्या शाळांमुळे मोबाईलवर सुरु असलेल्या ऑन-लाइन शाळेतून प्रत्यय आला आहे. तसेच या उपक्रमाचा प्रभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आव्हान त्यांनी केले आहे

लॅपटॉपचे लाभार्थी हे ९ वी, १०वी, ११ वी पास असणार आहेत, तर टॅबचे लाभार्थी ५वी ते १२वी मध्ये शिकत असलेले विद्यार्थी असणार आहेत.यापूर्वी सुद्धा अमेय घोले यांनी अनेक सामाजिक उपक्रम युवासेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी वेळोवेळी आयोजित केले आहेत. रक्तदान शिबीर, करिअर मार्गदर्शन, रोजगार मेळावे असे अनेक विविध उपक्रम अमेय घोले यांच्या माध्यमातून प्रभागात राबवण्यात आलेले आहे.

Team Global News Marathi: