‘पुष्पा’च्या गाण्याला मराठी टच, वाहतूक पोलीस आतीश खराडे यांच्या नव्या गाण्याचं होतंय कौतुक

 

पुणे | काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ चित्रपटाची क्रेझ काही कमी होताना दिसत नाही. ‘पुष्पा’च्या गाण्याची जादू बॉक्स ऑफिसवरच नव्हे, तर सोशल मीडियावरसुद्धा चालली आहे. ‘श्रीवल्ली’ हे गाणं तर चांगलंच ट्रेंडमध्ये राहिलं. अशा ट्रेंडमधील गाण्याचे व्हर्जन आले नाही तर नवलच! पुणेकर वाहतूक पोलीस आतिश खराडे यांनी ‘श्रीवल्ली’ गाण्याला मराठी तडका देऊन सादर केलेय. ‘श्रीवल्ली’चे मराठी व्हर्जन नेटकऱयांना भारीच आवडलं आहे.

काही महिन्यांपूर्वी ट्रफिक हवालदार आतिश खराडे हे ‘मनिके मागे हिथे’ या गाण्याच्या मराठी व्हर्जनने चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांनी ‘श्रीवल्ली’ गाण्याला मराठमोळा टच दिलाय. AK Police नावाच्या यूटय़ूब चॅनेलवर त्यांनी हे गाणे शेअर केलंय. खराडे यांनी गाणं नुसतं गायलं नाही, तर त्याचा व्हिडीओही केला आहे.

खराडे यांच्या या गाण्याला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. हे गाणं मी स्वतः लिहून गायले आहे. कोणत्याही स्टुडिओमध्ये रेकार्ंडग केलेले नसून मोबाईलमध्ये केले आहे, असे आतिश खराडे यांनी सांगितले. 11 जानेवारी रोजी त्यांनी हे गाणे यूटय़ूब चॅनेलला शेअर केले होते. त्याला हजारो व्हय़्जू मिळाले आहेत. खराडे वाहतूक पोलीस विभागातील नोकरी सांभाळून ते आपली गाण्याची आवड जोपासत आहेत.

Team Global News Marathi: