‘…मग बघूच कोण सरस आहे’, उद्धव ठाकरेंचं थेट अमित शहांना थेट आव्हान

 

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त राज्यातील तमाम शिवसैनिकांशी संवाद साधला होता, यावेळी मुख्यमंत्र्यांनी विविध विषयावर भाष्य करत महाविकास आघाडी संदर्भात आणि विरोधकांच्या टीकेला सडेतोड प्रतिउत्तर दिले होते. भाजपने पोकळ हिंदुत्व केलं आहे. विविध राज्यात सोईचे राजकारण करतात. त्यांनी हिंदुत्वासाठी काही राज्यात गोवंश हत्या बंदी केली, तर काही राज्यात ही सुरू ठेवली आहे. हे म्हणतात आम्ही लोकशाहीचा अपमान केला.

पण, तुम्ही आम्हाला गुलामाची वागणूक दिली. तुम्ही आम्हाला दिलेलं वचन मोडलं, त्यामुळेच आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीशी युती केली. पण, आम्ही तुमच्यासारखी सकाळी चोरुन नाही, तर संध्याकाळी शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने हजारो लोकांसमोर शपथ घेतली,” युतीमध्ये २५ वर्षे सडली हे माझं मत आजही कायम आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे, राजकारण म्हणजे गजकरण आहे, जेवढं खाजवावं तेवढी खाज आहे. हे राजकारणातले गजकरणी आहेत. ते राजकारण म्हणून काहीही खाजवतायत, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.

तसेच अमित शाह यांना टोला लागवतानामुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही एकट्याने लढू विरासारखे लढू पण ही लढाई करत असताना तुम्ही तुमचे अधिकार वापरायचे नाही, आम्ही आमचे अधिकार वापरणार नाही. कार्यकर्ते-कार्यकर्ते म्हणून आणि पक्ष म्हणून लढा, मग बघू कोण सरस आहे, ते पाहून घेऊ. पण आव्हानं द्यायची आणि ईडीची पिडा लावायची, याला काही अर्थ नाही, याला शौर्य म्हटले जात नाही, बाळासाहेबांनी काय उत्तर दिले असते हे सर्वांना माहिती आहे’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Team Global News Marathi: