शेतकरी करणार भाजपविरोधी प्रचार, राकेश टीकैत यांचा थेट मोदीला इशारा

 

नवी दिल्ली | देशात केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या ८ महिन्यापासून दिल्लीच्या वेशीवर अंदोलन करत असून अद्याप केंद्र सरकार त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार झालेले नाही आहे. आता या आंदोलनाला संपूर्ण देशभरातुन तसेच विदेशातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीला भाजपला धडा शिकवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांत भाजपविरोधात जोरदार प्रचार करण्याचे आंदोलक शेतकऱ्यांनी ठरविले आहे, असे भारतीय किसान युनियनचे नेते व प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितले. मुझफ्फरनगर येथे रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या विशाल मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला. येत्या २७ सप्टेंबरला देशव्यापी बंद पाळण्याचाही शेतकऱ्यांचा विचार आहे असेही टिकैत म्हणाले.

या मेळाव्याला हापूर, अलिगढ व इतर भागातले शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील उत्तर प्रदेशमधील हा सर्वात मोठा मेळावा होता, नव्या कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुझफ्फरनगर येथील मेळाव्याला अन्य शेतकरी नेतेही उपस्थित होते.

 

Team Global News Marathi: