शेतकऱ्यांची वीज तोडणी थांबवण्यासाठी या माजी शिवसेना नेत्याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

कोरोना काळात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना मोठया रकमेची बिले आली होती. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी या बिलातून सूट देण्यात यावी अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र आलेले बिल भरावेत लागेल अशी भूमिका राज्य सरकारने घेतली होती.

त्यात आता शिवसेना नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोत यांनी वीज बिलासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकार माध्यमांना दिलेली आहे. थकीत वीज बिलापोटी महावितरणकडून कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या सुरू झाली आहे.

गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात असताना शेतकरी अडचणीत सापडत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची विज तोडणी थांबवावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. तसेच वीज तोडणी थांबवण्याची विनंती केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आपण स्वतः लक्ष देणार असल्याचे सांगितल्याची माहिती खोतकर यांनी दिली आहे.

Team Global News Marathi: