राष्ट्रवादीचे मिटकरी आणि भाजपचे पडळकर यांच्यात चांगलीच जुंपली

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या मुद्द्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती टीका केली होती. या टीकेला आता आमदार अमोल मिटकरी यांनी जशाच-तसे उत्तर दिले होते. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलेच शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले होते.


गोपीचंद पडळकर यांनी अमोल मिटकरी यांचा बाजारू विचारवंत असा उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेसही होळकर घराण्याच्या विरोधात असून होळकर घराण्याचा इतिहास पुसून टाकण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप पडळकर यांनी केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यास जाणूनबुजून वेळ लावल्याचा आरोपही त्यांनी केला

तर या टीकेला उत्तर देताना मिलात्कारी म्हणाले की, पडळकर म्हणेज बिरोबाची शपथ घेऊन समाजाला विकणारा नेता आहे, अशा शब्दात मिटकरी यांनी पडळकरांचा समाचार घेतला. पडळकरांना कावीळ झाल्याने त्यांना सर्वत्र पिवळं दिसत आहे. पडळकर हे पिसाळलेल्या प्रवृत्तीचे असून ते भाजपला बुडवल्याशिवाय राहणार नाही, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

Team Global News Marathi: