फडणवीस -शिंदेंचा फॉर्मुला | 8 कॅबिनेट, 5 राज्यमंत्र्यांसह सरकार स्थापन करण्यासाठी तयारी सुरू

 

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षाच्या ३५ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारणात अगदी वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळत असून दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये बैठकांच्या फेऱ्या वाढल्या असून बंडखोर आमदार उद्धव ठाकरेंपासून वेगळे होऊन भाजपासोबत सरकार स्थापन करू शकतात. याबाबत अंतर्गत चर्चा सुरू आहे.

 

सध्या शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष दोन्ही पक्ष कोणत्या अटींवर सहमत आहेत, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आज बंडखोर आमदारांची बैठक घेतल्याची देखील चर्चा आहे. गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये ही बैठक झाली.

पहिला आणि मोठा प्रश्न एकनाथ शिंदे स्वतःसाठी उपमुख्यमंत्री पद मागणार का? त्यांना कोणती मंत्रिपदे मिळणार यावर जोरदाक चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जर बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले तर शिंदे गटातील 8 आमदारांना कॅबिनेट आणि 5 आमदारांना राज्यमंत्रीपद मिळू शकते. त्याचबरोबर 29 कॅबिनेट मंत्री भाजपचे असतील. बंडखोर आमदारांसोबत आलेल्या अपक्ष आमदारांना भाजपने त्यांच्या कोट्यातून मंत्री करावे, अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा आहे.

शिंदे गटाकडे विद्यमान सरकारचे 8 मंत्री आहेत. अशा परिस्थितीत या आमदारांना जे मंत्रिपद आधीपासून होते तेच मंत्रीपद शिंदे गटाला हवे आहे. कारण गेल्या महिनाभरात घेतलेले त्यांचे महत्त्वाचे निर्णय उद्धव ठाकरे सरकारने रोखले आहेत. कालच या मंत्र्यांकडून मंत्रीपदे हिसकावून इतर आमदारांकडे सोपवण्यात आली आहेत.

Team Global News Marathi: