नाशिक : राज्याचे माजी मुख्यमंत्री व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना नाशिक येथे रुग्णालयाच्या भेटीला गेले होते. मात्र तेथे या सर्व नेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते, सध्या या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात याच व्हिडिओची चर्चा होताना दिसत आहे.
समोर आलेल्या हाती आलेल्या माहितीनुसार,नाशिक येथे बिटको रूग्णालयात देवेंद्र फडणवीस,गिरीष महाजन आणि प्रविण दरेकर हे पाहणी दौरा करण्यासाठी आले होते.याच दरम्यान,या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती.त्यामुळे,सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला.यावरून,नागरिकांनी रोष व्यक्त करत गिरीष महाजन यांना खडे बोल सुनावले आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीसांवर उपरोक्त टीका सुद्धा करण्यात आली होती.
एकीकडे नाशिकमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना नेत्यांनी अशा प्रकारची गर्दी जमवणे योग्य आहे का? असा खडा सवाल रूग्णालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांना विचारला.तसेच,अनेकांनी “तुम्ही येथून माघारी जा” असेही नारे दिले.याच दरम्यान,महाजन आणि नागरिकांमध्ये चांगलीच गोची झालेली देखील पाहण्यास मिळाली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहेत.