मुंबई : मुंबई शहरात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या मुंबईची परिस्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. त्यात आता मुंबईत कोरोना रुग्णावर उपचार करणारे खाजही रुग्णालयाच्या बेड्स सुद्धा भरले आहेत.
दरम्यान, उद्योजक हर्ष गोयंका यांनी हे भयाण वास्तव दाखवणारा मुंबईतील एका बड्या हॉस्पीटलमधील एक व्हिडीओ शेअर केला आहे.हर्ष गोयंका यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत कोरोनामुळे झालेल्या परिस्थितीचा आरसा दाखवला आहे.
रुग्णालयात बेड्स उपलब्ध नसल्यानं रुग्णांना लिफ्टच्या लॉबीमध्ये बेड्स देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ मुंबईतील एका बड्या रुग्णालयाचा असल्याची माहिती गोयंका यांनी दिली. “रुग्णालये भरली आहेत. आवश्यक औषधांचाही तुटवडा आहे. लसी उपलब्ध नाहीत. मुंबईतील परिस्थिती गंभीर आहे,” असं त्यांनी व्हिडीओसह नमूद केले आहे.
Hospitals are full. Shortage of critical medicines. No vaccines. Situation in Mumbai grim. Be careful.
Here is a scene of the lift lobby of a leading hospital in Mumbai! pic.twitter.com/i8nAwEHpOd— Harsh Goenka (@hvgoenka) April 10, 2021