गुन्हे दाखल झाले तरी दहिदंडी साजरी कारण्याच्या पाठीमागे मनसे राहणार खंबीर उभी

 

लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिदंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहिदंडीला परवानगी शासनाने द्यावी अशी म्हणी करण्यात आलेली असताना सरसकट परवानगी नाकारण्यात आलेली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता मनसेसह सर्व विरोधकांनी ठाकरे सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यातच आता कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकारने दहीहंडीला परवानगी नाकारणे संतापजनक आहे. गणेशोत्सवाला परवानगी आणि दहीहंडीसाठी कोविडचा बाऊ हा कुठला न्याय. किमान त्यांच्या मानसिकतेचा तरी विचार सरकारने करायला हवा. तेव्हा, कितीही बंधने घातली, गुन्हे दाखल केले तरी दहीहंडी साजरी करणाऱ्या मंडळांच्या पाठीशी मनसे ठामपणे उभी राहील असा थेट इशाराच मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सरकारला दिला आहे.

राजकीय दौरे, मेळावे तसेच गर्दीतील कार्यक्रम करणाऱ्या सरकारकडून केवळ मराठी सणांवरच आक्षेप आणि निर्बंध लादले जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना या निर्णयाला कडाडून विरोध करीत आहे. एकतर दहीहंडीसंबधात आज मुख्यमंत्र्यासमवेत पार पडलेल्या समन्वय समितीच्या बैठकीला विश्वविक्रम केलेल्या एकाही नामांकित गोविंदा पथकांना निमंत्रित केले गेले नव्हते.

तसेच ता बैठकीला जे उपस्थित होते त्यांना तर बोलूही दिले नाही. केवळ टास्क फोर्सने आपले कोविड पालुपद सुरू ठेवल्याचा आक्षेप या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी नोंदवला आहे. याचाच अर्थ सरकारला तरुणाईच्या इच्छा आकांक्षाशी काही देणे घेणे नाही. गेली दोन वर्षे ही तरुण मंडळी दहीहंडीचा सण साजरे करू शकलेले नाहीत असे मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव म्हणाले.

Team Global News Marathi: