पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने आरोप असलेल्या व्यक्तीला तिकीट देऊन मतदारांचा अपमान केला आहे. समोर आलेल्या माहिती नुसार उन्नाव बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले कुलदीप सेनगरच्या पत्नीला भाजपने थेट निवडणुकीचं तिकीट दिले आहे.
गीता कुलदीप सेनगर भाजपच्या तिकीटीवर उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणूक लढणार आहेत. संगीता सेनगर यांच्याकडे उन्नाव जिल्हा पंचायतीचे यापूर्वी अध्यक्षपद होते. संगीता सेनगर फतेहपूर चौरासी त्रितयामधून निवडणूक लढणार आहेत. मागच्या वर्ष आरोप झाल्यावर कुलदीप यांचे विधानसभा सदस्यता रद्द केली होती.
उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणात कोर्टाने सेनगर यांना दोषी ठरवत १० वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसंच १० लाखांचा दंडही ठोठावला होता.दरम्यान २०१७ मध्ये अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कार प्रकरणी न्यायालयाने कुलदीप सेनगर यांना आधीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कुलदीप सेनगर हे भाजप आमदार होते. बलात्कार प्रकरणात नाव आल्यानंतर पक्षाने त्यांची हकालपट्टी केली होती. मात्र त्यांच्या पत्नीला देण्यात आलेल्या तिकीटामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच विरोधकांनी सुद्धा हाच मुद्धा पकडून भाजपच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.