निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेनेने उचलले पाऊल

 

 

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदार यांच्यावर निगडित कारवाई तसेच महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. आयोगानं दिलेल्या नोटीशीवर कोर्टानं स्थगिती देण्याची विनंती करणार असून अनेक बाबी अद्याप कोर्टात प्रलंबित असल्याची याचिका शिवसेनेने केली आहे. निवडणूक आयोगाच्या नोटिशीविरोधात आज (सोमवारी) शिवसेनेचे वकील ही गोष्ट सुप्रीम कोर्टात मेन्शन करणार आहेत.

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या प्रतिस्पर्धी गटांना पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील दाव्याच्या समर्थनार्थ 8 ऑगस्टपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले आहे. आता निवडणूक आयोगाच्या याच आदेशाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची महिती आहे.

 

सर्वोच्च न्यायालयात पक्षाशी निगडित महत्त्वाच्या बाबी प्रलंबित असताना त्याआधीच चिन्हाची लढाई सुरू झाल्याने शिवसेनेचे पाऊल उचलले आहे. आयोगाने दिलेल्या नोटीशीवर कोर्टाने स्थगिती देण्याची शिवसेनेनं विनंती केली आहे. आज सकाळी सुप्रीम कोर्टात शिवसेना ही बाब नमूद करणार आहे. दोन्ही बाजूंना 8 ऑगस्टपर्यंत आपापलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगाने वेळ दिला आहे.

देशाच्या नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज घेणार राष्ट्रपतीपदाची शपथ

‘एकनाथ शिंदे मर्द मराठा, छत्रपतींचा मावळा’;  सेना खासदाराने व्हिडिओ केला शेअर 

 

 

Team Global News Marathi: